scorecardresearch

ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार धानोरकरांना भोवणार, भाजपची पोलिसांकडे तक्रार

धानोरकर यांची तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार धानोरकरांना भोवणार, भाजपची पोलिसांकडे तक्रार
ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार धानोरकरांना भोवणार, भाजपची पोलिसांकडे तक्रार

नागपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धानोरकर यांची तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

भाजयुमोच्या तक्रारीनुसार, धानोरकर यांनी १३ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली. फडणवीस यांनी नागपुरात अनेक ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनाही पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. भाजपमध्ये कधीही जबाबदारी देताना जात पाहिली जात नाही, असा दावा तक्रार करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री दीपांशू लिंगायत आणि शिवानी दाणी यांच्या नेतृत्वात धंतोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.