नागपूर : काँग्रेसचे नेते करत काहीच नाही केवळ बोलत असतात.लोकसभेत त्यांना यश आले तेव्हा ईव्हीएम चांगले होते आणि आणि विधानसभेत त्यांना अपयश आल्याने ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे सांगत पराभव झाल्याचे सांगतात. मुळात त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे ते सातत्याने ईव्हीएमवर बोलत असल्याची टीका भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.आमदार किशोर जोरगेवार नागपुरात शनिवारी सकाळी प्रसार माध्यमाशी बोलत होते. आज आमदारांचा शपथविधी सोहळा असल्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा आटोपून नागपूरला आल्यानंतर आज पुन्हा विशेष अधिवेशनासाठी मुंबईला जात आहे. मी जनतेची सेवा केली असल्यामुळे त्यांचा असलेला विश्वासामुळे मला त्यांनी विधानसभेत निवडून पाठवले आहे.आजपासून खऱ्या अर्थाने माझ्या नवीन कारकिर्दीला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंब हे चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. फडणवीस यांच्याकडे राज्याच्या विकासाचे व्हीजन आहे. त्यामुळे आता विदर्भाच्या विकासाचा मार्ग फडणवीस यांच्यामुळे सुकर झाला आहे. चंद्रपूरमधून मला निवडून दिले आहे. राज्यात आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहे. जनतेला विकास हवा आहे. महाविकास आघाडीने विकासाच्या नावावर केवळ घोषणा केल्या आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे अडीच वर्ष सरकार असताना राज्याच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष केले.

हेही वाचा…बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आजपासून सुरू झालेले विशेष अधिवेशन केवळ शपथविधीसाठी आहे. खऱ्या अर्थाने आता नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुरू होईल. नागपूरच्या अधिवेशनात जास्तीत जास्त विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होईल असेही जोरगेवार म्हणाले.महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेतासाठी सुद्धा बहुमत नाही अशी त्यांची स्थिती आहे.

त्यांच्याकडे आता विषय राहिलेले नाही आणि कुठलाही अजेंडा नाही. महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमवरुन काही वक्तव्य करत असतील त्यांचा तो अधिकार आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे ते पराभवानंतर काहीही बोलू शकतात. लोकसभेत काँग्रेसला यश मिळाले होते आणि महायुतीच्या विरोधात निकाल होता त्यावेळी त्यांची ईव्हीएमच्या विरोधात तक्रार नव्हती. लोकसभेनंतर राज्य सरकारने नवीन योजना लागू केल्या. महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.

हेही वाचा…गोंदिया: निर्दयीपणाघा कळस, श्वानाचे हातपाय, तोंड बांधून पोत्यात भरले, जंगलात फेकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांसाठी, लाडक्या भावासाठी योजना सुरू केल्या. विविध समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत काँग्रेसने केलेला फेक नरेटिव्हचा प्रचार लोकांच्या लक्षात आला त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले असल्याचे जोरगेवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्याला कायम मंत्रीपद मिळाले आहे. पुढच्या काळात सुद्धा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.