चंद्रपूर: “माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र राज्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना हे पत्र वितरीत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या या पत्राची सुरूवात प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती, या मंगल देशाचे आहे भविष्य अपुल्या हाती या काव्याने केली आहे. महापुरूषांचा वारसा लाभलेला हा देश कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, बुध्दीवंतांनी आणि विचारवंतांनी घडविला आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अभियान सुरू केले आहे.

हेही वाचा : वर्ष सरले तरीही विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेसची ‘लेटलतीफी’ सुरूच; प्रवासी त्रस्त, रेल्वे विभाग सुस्त

Funny Slogan Written Behind Indian Trucks election fever Video Goes Viral
“एकदा निवडून येऊद्या मग…” ट्रकच्या मागे शायरी लिहत दिलं आश्वासन; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Giraffe has to face many problems while drinking water shocking video
“आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…” जिराफाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल यामागचं कारण
panvel municipal corporation school marathi news
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत पनवेल महापालिकेने बाजी मारली
‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’

विद्यार्थ्यांमध्ये वाचन गोडी निर्माण व्हावी यासाठी “महावाचन महोत्सव” हा उपक्रम राबविला जाणार आहे. शेती व तंत्रज्ञानाच्या आवडीसाठी “माझी शाळा माझी परसबाग” उपक्रम राबविणार आहे. स्वच्छता व आरोग्यासाठी “स्वच्छता मॉनिटर टप्पा २” अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी “एक राज्य, एक गणवेष” योजना राबविणार आहे. मुलामुलींना बुट व पायमोजेही देणार आहे. पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पोषक आहारासाठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांनी विकसीत केलेल्या परसबागेतील भाज्या व फळे आहारात देण्याची योजना आखली आहे. आरोग्य तपासणीसाठी भारतीय बालरोगतज्ञांच्या असोसिएशनसोबत करार केला आहे. शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन लावण्यात येणार आहे. नोकरीच्या संधीसाठी एचसीएच, टीआयएसएस या संस्थांसोबत सरकारने करार केला आहे. आठवीपासूनचे व्यावसायिक शिक्षण सहावी पासून दिले जाणार आहे. जर्मनीमध्ये नोकरीच्या संधीसाठी त्या देशाशी करार केला जात आहे.

हेही वाचा : निराधार महिलेला डोक्यातील जखमेत अळ्या, मेडिकलमध्ये डॉक्टरांनी…

उच्च शिक्षण व नोकरीच्या कक्षा विचारात घेवून मनोवैज्ञानिक चाचण्या, पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. शाळांमध्ये डीजीटल लॅब्ररी, इंग्लीश लॅग्वेज लॅब, सिस्टीम लॅब, रोबोटीक लॅब उभारून २१ व्या शतकातील शिक्षणाच्या अद्यावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळांची सद्यास्थिती व अनुदानाची स्थिती लक्षात घेवून दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे. या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल, त्यासाठी कला, क्रीडा, विज्ञान, ज्ञान अशा विविध क्षेत्रात पारंगत व्हा. तूमच्या स्वप्नंना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यासह अनेक वस्तू, साधने उपलब्घ करून देत आहोत. तुमचा विकास व्हावा यासाठीच हा खटाटोप आहे. शाळेप्रति उत्तरदायित्वाच्या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनीही यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रातून केले आहे.

हेही वाचा : राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…

चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना पत्र वितरीत करणार

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), चंद्रपूर यांनी पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे संदेशपत्र घेवून जाण्यास सांगितले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांना १७९ गठ्ठे वितरीत करण्यात आले आहे. एक गठ्ठा हा १५०० पत्रांचा आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३ लाख २५ हजार पत्र वाटप केले जाणार आहे. सर्वांधिक ४२ गठ्ठे चंद्रपूर तालुक्यात वितरीत केले गेले.

८७ लाखांपर्यंतचे बक्षीस

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम १ जानेवारी ते १५ जानेवारी या ४५ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सर्व माध्यमांच्या शाळात हा उपक्रम राबविला जात आहे. केंद्र, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर या शाळांचे मुल्यांकन होणार आहे. केंद्र स्तरावरून राज्य स्तरावर निवड झालेल्या शाळांना ८७ लाखापर्यंत बक्षीस आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थ्यांना पत्र पोहचविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी(प्राथमिक) राजकुमार हिवारे यांनी दिली.