वर्धा : अवकाळी पावसात भाजीपाला व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, भाजीपाल्याचे भाव वाढण्याऐवजी स्वस्त झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

किलो मागे पालक दहा रुपये, चवळी शेंगा दहा, पान कोबी दहा, फुलकोबी दहा, भेंडी पंधरा ते वीस, गवार तीस, टमाट पंधरा, वांगे पाच ते दहा रुपये किलो ठोक बाजारात विकल्या जात असल्याचे भाज्यांचे ठोक विक्रेते राजाभाऊ जोगे यांनी सांगितले.

हेही वाचा – कैद्यांद्वारे निर्मित वस्तूंची आता ‘ऑनलाईन’ विक्री

भाव वाढतात पण दहा दिवसांपूर्वी चढत्या उन्हात भाजीपाला करपू लागला होता. या पावसाने त्यास संजीवनी मिळाली आहे. हे विदर्भातच नव्हे तर सार्वत्रिक चित्र आहे. आता भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून हे ढगाळ वातावरण भाजीस पोषक असल्याचे शेतकरी सांगत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

हेही वाचा – नागपूरकरांचा ई-वाहनांकडे वाढता कल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठोक बाजाराची अशी स्थिती असल्याने भाजी उपटून फेकून द्यायची का असा सवाल शेतकरी वर्तुळातून येतो. मात्र हे पण खरेच की चिल्लर विक्रीत सामान्य ग्राहकांना किमान चाळीस रुपये किलोचाच दर पडत आहे.