scorecardresearch

बुलढाणा: दुचाकीचा ‘कट’ अन् दोन भिन्नधर्मीय गटात तुंबळ हाणामारी!

चितोडा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप

fight between two group
जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

बुलढाणा: दुचाकीचा धक्का लागल्याचे क्षुल्लक कारणावरून दोन भिन्नधर्मीय गटात तुंबळ हाणामारी झाली. प्रकरणी दोन्ही गटाच्या मिळून १९ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

खामगाव तालुक्यातील चितोडा या ‘संवेदनशील’ गावात ही घटना घडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस गावात तळ ठोकून असल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खामगाव तालुक्यातील चितोडा येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मोटारसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटातील तुंबळ हाणामारीत झाले. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- देशासाठी धावण्याचा ध्यास : ‘देव’ धावतो दररोज २५ किमी; ‘अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये विक्रम करण्याचे ध्येय

याप्रकरणी शेख रिहान शेख अहमद याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. गौतम महादेव तिडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख रीहान शेख अहमद यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी महिलांचा विनयभंग व दागिने, रोख रक्कमेची लूटमार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी हे मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावात तणाव आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:00 IST

संबंधित बातम्या