नागपूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. दरम्यान रविवारी रात्री मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबई तुंबली आहे. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावर देखील झाला. आमदार विधानभवनात वेळेत पोहोचू न शकल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक रस्ते बंद आहेत तर कित्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली झाली आहे. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यासह मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा देखील कोलमडली आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक कासवगतीने चालू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालय गाठण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मुंबईकडे येणारे आमदार आणि मंत्रीदेखील या पावसात अडकले आहेत. त्यामुळे त्यांनाही विधीमंडळ गाठणे अवघड झाले आहे. हेही वाचा - नागपूर ते लंडन: चक्क कारने १६ हजार किलोमीटरचा प्रवास विदर्भातील आमदार आज सकाळी मंबईकडे जाण्यासाठी नागपूर विमानतळावर पोहोचले. परंतु मुंबई तुंबल्याने मुंबईहून येणारे विमान आले नाही. हेच विमान पुढे मुंबईकडे रवाना होणार होते. तिकडून येणाऱ्या विमानाला विलंब झाल्याने आमदारांना मुंबईला वेळेत जाणे शक्य नाही. अनेक आमदार नागपूर विमानतळात ताटकळत बसले होते. यामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, रवी राणा, देवेंद्र भुयार आणि सुभाष धोटे यांचा समावेश होता. याशिवाय रेल्वेगाडीने मुंबईकडे निघालेल्या आमदारांना देखील पावसाचा फटका बसला. रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचल्याने तसेच काही भागात दरड कोळसल्याने ठिकठिकाणी रेल्वेगाड्या थांवबण्यात आल्या. दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते. मात्र ते ज्या एक्सप्रेसने मुंबईला येत होते, ती एक्सप्रेस कुर्ला आणि दादरच्या मध्ये अडकल्याने इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रूळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले. विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना देखील रेल्वेगाडीतून खाली उतरावे लागले. हे सर्व मंत्री, आमदार कसेबसे विधानभवन गाठण्याचा प्रयत्न करीत होते. हेही वाचा - राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात होणार मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. यामुळे कार्यालय गाठण्यासाठी कामगारवर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे दादर, वडाळा, कुर्ला या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मुंबईहून नागपूरला विमान वेळेत आले. त्यामुळे नागपूरहून निघाणाऱ्या विमानाला विलंब झाला. त्याचा फटका आमदारांसोबत प्रवाशांना बसला.