गोंदिया :- राज्यासह देशात हिंदूच्या, हिंदुत्वच्या नावावर मत मागून सत्तेवर आलेलं हे सरकार हिंदूंना बरबाद करणारे सरकार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रा निमित्त आले असताना माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> राजकारणात लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षांना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पटोले म्हणाले, की आज मी हिंदूच्या सर्वात मोठा सण महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन करण्याकरिता येथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, त्यांना कोणताही त्रास होऊ नये करिता त्यांची सोय करण्याकरिता आलेलो असताना राजकीय टीका करणार नाही. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवारच अमरावती नागपूर पदवीधर शिक्षक मतदारसंघ सारखीच अनपेक्षितरित्या जिंकणार असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या प्रसंगी म्हणाले.