नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष. यानिमित्ताने शिवरायांचा पराक्रम गावोगावी घरोघरी पोहोचवण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महानाट्य आयोजित करण्याचे ठरवले. त्याची सुरुवात गुरुवारपासून नागपूरमधून होत आहे.

छत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर आणला तर त्याकाळातील चित्र आठवते. लोकांसमोर हा इतिहास मांडायचा म्हटले की भव्यदिव्य राजवाडे, किल्ले, सैनिक, घोडे आणि उंट हे सर्व दाखवणे आवश्यक आहे. ही सर्व जुळवाजुळव सध्या नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर सुरू आहे. नागपूर महानगरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाट्याचा प्रयोग होणार आहे. शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग लोकांपुढे महानाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण २०० च्या वर कलाकार करणार आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : मुख्याधिकारी डोल्हारकर यांच्या निलंबनासाठी काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन; आमदार येरावार यांनी बढतीसाठी पत्र दिल्याने संताप

हेही वाचा – वर्धा : आंबटशौकीन मजनूस नागरिकांनी चोपले, मोबाईलमध्ये महिलांची छायाचित्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानाट्याला प्रवेश मोफत असेल, मात्र त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्याच्या उपराजधानीत होणाऱ्या या महानाट्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणेला कामाला लावण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यशवंत स्टेडियमला भेट दिली व व्यवस्थेची पाहणी केली.