धर्म, अध्यात्माच्या बळावर सगळे काही मिळवता येते. परंतु विज्ञानामुळे मर्यादा येतात. सत्य, करुणा, तपस्या आणि सुचिता या चार पायांवर धर्म उभा आहे. विज्ञानालाही धर्माची जोड मिळाल्यास जीवन सार्थकी लागते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

हेही वाचा- राज्यपालांकडून पुन्हा वादाला तोंड; नागपूर विद्यापीठात केलेल्या नियुक्त्यावरून वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारंजा येथील स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सध्या सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘विज्ञान युगात धर्माचे महत्त्व’ या विषयावर आयोजित व्याखानमालेत ते बोलत होते. यावेळी संस्थानचे बाबासाहेब तराडे, विनायक सोनटक्के, प्रकाश खुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक म्हणाले, विकास करताना पर्यावरणाचा विचार होत नाही. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न समोर येत आहे. विज्ञानात सुद्धा प्रचितीला महत्त्व आहे. विज्ञानाला प्रयोगशाळा लागते. परंतु अध्यात्माला प्रयोगशाळेची गरज नाही. विज्ञानाने सर्व सुविधा मिळतील परंतु उन्नती आणि समाधान मिळणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.