लोकसत्ता टीम

वर्धा : अतिरिक्त ठरले की किंमत कमी होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव. शिक्षकवर्ग अलीकडे हा अनुभव आता घेत आहेच. त्यांना आता सामावून घेण्याचा निर्णय झाला असून दिवाळीपूर्वीच ते नव्या शाळेत रुजू होणार.

आणखी वाचा-‘एसटी’ची पहिली लक्झरी स्लिपर कोच पुण्याकडे रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुदानित तसेच अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेत अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांच्या समयोजनचे वेळापत्रक ठरले आहे. अनेक शाळांत पदे रिक्त पण भरती बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्याची शिक्षण संचालनालयाने दखल घेतली. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी सचिन जगताप १० ऑक्टोंबर पासून संस्थंतर्गत समायोजन, १३ तारखेपर्यंत रिक्त पदांची माहिती, १८ ला यादी प्रकाशित व ३१ ऑक्टोंबर रोजी समायोजन समुपदेशन होणार. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन नियमानुसार रिक्त जागांवर होईल. एकाही शिक्षकावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही जगताप यांनी दिली आहे.