बुलढाणा : मेहकर भाजपामध्ये आज, रविवारी झालेल्या राडाप्रकरणी भाजपाच्या ६ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी संध्याकाळी उशिरा तडकाफडकी ही कारवाई केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी केलेल्या चर्चेअंती हा निणर्य घेण्यात आला.

शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर, अशी सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – मध्य प्रदेशातील भाजप विजयात अकोल्याचा वाटा, जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; ‘या’ रेल्वेच्या फेऱ्या रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहकरात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटांत आज दुपारी राडा झाला. जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे, हे भाजप कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते जखमी झाले.