scorecardresearch

Premium

चंद्रपूर : जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

शिंदे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्याकडे राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वीही दोन वेळा राजीनामा नाट्यप्रयोग केला आहे.

resignation of Ravindra Shinde
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा एकमताने मंजूर (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स/फिनान्शियल एक्सप्रेस)

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३६० पदांची नोकरभरती टीसीएस व आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून करावी, अशी मागणी करीत रवींद्र शिंदे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

शिंदे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्याकडे राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वीही दोन वेळा राजीनामा नाट्यप्रयोग केला आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष रावत व संचालक मंडळ त्यांचा राजीनामा मंजूर करते का? याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Shiv Sainik stationed before devendra Fadnavis program
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; आमदार नितीन देशमुख म्हणाले, “वरती हप्ते…”
devendra-fadnavis
“सर्वप्रथम तुम्ही रुग्णालयात जा,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रवींद्र टोंगे यांना प्रेमाचा सल्ला, म्हणाले…
sudhir mungantiwar uddhav thackeray
“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर…”, आमदार अपात्रतेवर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य
baban gholap
बबन घोलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा; ठाकरे गटाला धक्का, आज उद्धव ठाकरेंशी चर्चा

हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा : बुलढाणा जिल्हा, आयोजकांसह इतर भागांतही उत्सुकता!

हेही वाचा – हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अन्य विषयांसह संचालक शिंदे यांच्या राजीनाम्याचा विषय ठेवण्यात आला होता. या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शेवटी शिंदे यांचा संचालकपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बँकेत येत्या काळात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The resignation of ravindra shinde director of the district bank at chandrapur was unanimously approved rsj 74 ssb

First published on: 13-09-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×