लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी खासगी वाहन उलटल्याने दोन जणांचा मृत्यू तर, तीन जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करवड येथील रहिवासी आहेत.
आणखी वाचा-नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे वाहन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूचा संरक्षक अडथळा तोडून वाहन दोन्ही मार्गिकांमध्ये असलेल्या चारीत जाऊन उलटले. या अपघातात बाजीराव गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. निशा गडगुळ (२०) हिचा रुग्णालयात मृत्यू झाला. चालक परमेश्वर गडगुळ (२१), मीनाबाई गडगुळ (४६) हे गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून सिन्नर आणि नाशिक येथे रवाना करण्यात आले. वावी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
