जळगाव : मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन नागपूर आणि पुणे दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

दिवाळीच्या सणाला गावी परतलेल्या प्रवाशांना घरी सुखरूप पोहोचता यावे, यासाठी मध्य रेल्वेने तब्बल १,७०२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर तसेच पुणे ते नागपूर या मार्गादरम्यान धावणाऱ्या एकूण १८ अतिरिक्त विशेष गाड्यांचा देखील त्यात समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला पहाटे ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ०४.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. त्याच प्रमाणे गाडी क्रमांक ०१०१२ नागपूर येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला रात्री १०.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

पुणे-नागपूर-पुणे विशेष (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१४०९ विशेष गाडी पुणे येथून २५, २७ आणि २९ ऑक्टोबरला रात्री ०८.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१४१० विशेष गाडी नागपूर येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला दुपारी ०४.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. एक वातानुकूलित द्वितीय, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

पुणे-नागपूर-पुणे विशेष (सहा सेवा)

गाडी क्रमांक ०१४०१ विशेष गाडी पुणे येथून २६, २८ आणि ३० ऑक्टोबरला रात्री ०८.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१४०२ विशेष गाडी नागपूर येथून २७, २९ आणि ३१ ऑक्टोबरला दुपारी ०४.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. एक वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, १३ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची संरचना असेल.

नागपूर-पुणे दरम्यान चालविण्यात येणाऱ्या १२ गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांना विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर करता येणार आहे. विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.