लोकसत्ता टीम

उरण : सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरीकांनी पाणी, रस्ते, शिक्षण, गटार, आरोग्य व दळणवळण या समस्यांचा पाऊस पाडला. यात सीआरझेड समस्या दूर करणार, सीसी, ओसी आणि मावेजा, पिण्याच्या पाणी समस्या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केलं जाईल, सिडकोत लढल्याशिवाय काही मिळणार नाही. द्रोणागिरीमध्ये रुग्णालय, पोलीस ठाणे आदी समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन बालदी यांनी दिले.

आणखी वाचा-उरण रेल्वे स्थानक अंधारात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी येथील द्रोणागिरी नोड मधील नागरिक विश्वनाथ पाटील यांनी सीआरझेड क्षेत्रामुळे अनेक वर्षांपासून इमारतींना ओसी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सेक्टर ५१ व ५२ ला जोडणारे खाडीपूल धोकादायक, वाहन चालकांना धोका असल्याचा मनोज म्हात्रे यांनी मांडली, सुरक्षा म्हणून पोलीस चौकी, सीसीटीव्ही, बसविण्यात यावे जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होईल. अनिल बेंगडे, अक्षर ईस्टोनिया सारख्या उच्चभ्रू वस्तीत पाणी समस्या गंभीर असल्याचे मत नवनाथ जगताप व रजनी रंजन यांनी मांडली. या वस्तीला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्याशिवाय पाणी कमी दाबाने, सांडपाणी, आरोग्य सुविधांची कमतरता, या समस्या आहेत. या दरबाराचे आयोजन विधीत पाटील यांनी केले तर यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपा नेते चंद्रकांत घरत, रवी भोईर, महेश कडू, पंडित घरत आदीजण उपस्थित होते.