वाशी प्लाझामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकाने आहेत. शिवाय खासगी कार्यालयेदेखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांचा राबता असतो. मात्र या ठिकाणी बाहेरील व्यक्ती येऊन दिवसभर वाहने उभी करून ठेवत असल्याने तेथील स्थानिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे सामाईक जागेत अवैध पार्किंग होत असल्याने या ठिकाणी स्थानिक दुकानचालक आणि इतर वाहनचालक यांच्यामध्ये खटके उडत आहेत.
हेही वाचा – नवी मुंबई : ‘येथे’ चोरीच्या पाण्यावर बहरतात रोपवाटिका; मनपाच्या भरारी पथकाचे दुर्लक्ष
हेही वाचा – नवी मुंबई : नियमबाह्य शुल्क वाढीविरोधात पालकांचे आंदोलन
नवी मुंबई शहरात वाहनतळ उपलब्ध नसल्याने, तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या वाहनांची पार्किंगची समस्या अधिक बिकट होत चालली आहे. वाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची दुकाने तसेच खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते. सध्या येथील वाहनतळ सुविधा अपुरी पडत असून या ठिकाणी बाहेरील वाहने तासनतास उभी केली जात आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने या ठिकाणी बऱ्याच वेळा खडाजंगी होत असते. त्यामुळे वाशी प्लाझामध्ये दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न बिकट होत चालला आहे.