नवी मुंबई : नवी मुंबई शहरात इमारतीचा वापर करण्यासाठी पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक असून त्याशिवाय २१११ इमारतींचा वापर सुरू असल्याने पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र घ्या अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.

उच्च न्यायालयात याबाबत एक जनहित याचिका असून न्यायालयाच्या आदेशानुसार भोगवटा प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतु इमारतीचा वापर करण्यासाठी पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. परंतु भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in संकेतस्थळावर तसेच महानगरपालिकेच्या सर्व ८ विभाग कार्यालयांच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात दाखल याचिकेत २५ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची यादी सादर करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्यास अनुसरून सर्व विभाग कार्यालयांनी सर्वेक्षण करून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींचा अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभिलेखातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१११ इमारतींमधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या सर्व इमारतींना वापर सुरू करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याविषयीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर करुन भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे. अन्यथा कार्यवाही करण्यात येणार आहे. – सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक नगररचना विभाग, नमुंमपा