नवी मुंबई : गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीतील एका डांबर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला लागलेली आग दोन अडीच तासात विझली खरी मात्र त्याच्या उग्र वासाने आसपास राहणारे दोनशे पेक्षा अधिक लोकांना नाक मुठीत धरून भर पावसात परिसर सोडला होता. दरम्यान काही लोकांनी पुढे येत त्यांना आसरा देत रात्र जेवणही दिल्याने पावसापासून तरी त्यांची सुटका झाली.

हेही वाचा >>> तळोजात मोदी केम फार्मा कंपनीत सायंकाळी भीषण आग

हेही वाचा >>> शहरात मुसळधारा मोरबे क्षेत्रात मात्र रिमझिम; मोरबे धरणात ८५% पाणीसाठा

गुरुवारी रात्री नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी स्थित जी. एल. कन्स्ट्रक्शन ( भूखंड क्रमांक २०३) या रासायनिक कंपनीत आग लागली होती. कंपनीत रस्ते बांधकामात लगणार्या डांबरावर प्रकिया करण्याचे काम कंपनी चालते. त्यामुळे आग लागल्यावर काळ्या रंगाच्या अत्यंत उग्र वासाचे धुराचे लोट परिसरात पसरले होते कंपनी नजीक दोन डंपर , एक ट्रक व चार झोपड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. डांबर जळण्याच्या उग्र वासाने डोळे जळजळणे, मळमळ होते त्रास अनेकांना झाला त्यामुळे परिसरातील रहिवासी घराला टाळे लावत सुमारे दिड दोन किलोमीटर पर्यंत लांब जाऊन थांबले होते. त्यात वरून धो धो पाऊस पडत होता त्यामुळे सुमारे दोनशेच्या आसपास रहिवासी अचानक उघड्यावर पडले होते स्थानिक रहिवासी व व्यावसायिक अमित मेंढकर यांनी पुढाकार घेत या सर्वांची सोय तुर्भे नाका परिसरातील दोन कंपनीतील आवार आणि एका शाळेत केली त्यांचे राहणे जेवणाचीही व्यवस्था केल्याने ऐन पावसात रात्रभर बाहेर राहण्यापासून वाचले. सकाळच्या वेळी  पाऊस थांबल्याने उग्र वासाची तिव्रता सकाळपर्यंत हळू हळू ओसरली व दुपार पर्यंत रहिवासी आपापल्या घरी परतले आहेत.