05 April 2020

News Flash

कुतूहल : जंगल

‘जंगल’ शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर आभाळाशी स्पर्धा करणारी उंच उंच झाडे, हवेतला थंडगार ओलसरपणा, सगळीकडे हिरव्या रंगाच्या छटा असं दृश्य तरळून जातं.

प्रत्येक ठिकाणची हवा, पाणी, माती, तापमान वेगवेगळं असतं त्याप्रमाणे प्रत्येक जंगल वेगळं असतं प्रत्येक जंगलाची स्वतची वैशिष्टय़ं असतात.

संगीता जोशी
office@mavipamumbai.org
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

‘जंगल’ शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर आभाळाशी स्पर्धा करणारी उंच उंच झाडे, हवेतला थंडगार ओलसरपणा, सगळीकडे हिरव्या रंगाच्या छटा असं दृश्य तरळून जातं. ‘भरपूर संख्येने झाड किंवा वनस्पती असलेला प्रदेश’ अशी ढोबळमानाने जंगलाची व्याख्या करता येईल. पण जंगल म्हणजे फक्त झाड आणि त्यातही मोठे वृक्षच असतात का? त्या प्रदेशातील हवा/तापमान, पाऊस, वारा, डोंगर, माती, कडेकपारी, प्राणी, पक्षी, कीटक, झाडेझुडपे, वेली,अगदी शेवाळंसुद्धा या सगळ्याचं जे मिश्रण तयार होतं ते म्हणजे जंगल. प्रत्येक ठिकाणची हवा, पाणी, माती, तापमान वेगवेगळं असतं त्याप्रमाणे प्रत्येक जंगल वेगळं असतं प्रत्येक जंगलाची स्वतची वैशिष्टय़ं असतात. एक परिपूर्ण जंगल तयार व्हायला शेकडो वष्रे लागतात. तयार झालेलं जंगलही सातत्याने बदलत असतं. थोडक्यात, जंगल ही एक ‘जिवंत परिसंस्था’ आहे.

लता, वेली झुडपे, जमिनीलगत (जणू सरपटत) वाढणाऱ्या वनस्पती, भूछत्र/ अळंबी यांची संख्याही जंगलात भरपूर असते. चार थरांचे जंगल हे अतिशय समृद्ध मानले जाते. जमिनीलगतचे शैवाल, सूक्ष्म वनस्पती, गवत इत्यादी हा पहिला स्तर, सहा-सात फूट उंचीची झुडपे हा दुसरा स्तर, १२ ते १५ फूट उंचीचे छोटे वृक्ष हा तिसरा स्तर आणि मोठे उंच वाढणारे वृक्ष हा चौथा स्तर.

प्रत्येक जंगलात हे सगळे स्तर असतीलच असे नाही. जंगल पृथ्वीच्या कोणत्या भागात आहे त्यावर तिथे कोणती झाडे आहेत आणि या वनस्पतींवर तिथे कोणते प्राणी, पक्षी, कीटक असणार हे अवलंबून असते. अनेक जंगलांमध्ये खूप उंचीचे सदाहरित वृक्ष असतात, पर्णसंभार भरपूर पसरलेला असतो तिथे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतच नाही आणि जमिनीलगतच्या वनस्पती फारशा वाढू शकत नाहीत. जंगलांच्या चारही स्तरात वेगवेगळे प्राणी, पक्षी, कीटक आढळून येतात. अनेक प्रदेशांत गवताळ वनेही दिसून येतात. इथे मोठय़ा वृक्षाचे प्रमाण खूपच कमी असते व नजर जाईल तिथपर्यंत गवतच गवत दिसते. इथे असणारे प्राणी, पक्षी पूर्णपणे वेगळे असतात. काही ठिकाणी फक्त काटेरी झाडांची वने दिसून येतात अशी वनांची विविधता आपल्याला पृथ्वीवर सर्वत्र अनुभवायला मिळते.

आता समुद्र खाडी किंवा नदी किनारी वाढणारी खारफुटीची जंगले (कांदळवन)  हाही कायदेशीररीत्या जंगलाचा भाग म्हणून ओळखला जातो. जंगल किंवा वन हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता (जीविधता) आढळून येते. महाराष्ट्रातील जंगलांच्या पाच प्रकारांपैकी चार हे दक्षिण-विषुववृत्तीय जंगलांचे उपप्रकार आहेत, पण कांदळवन  हा पाचवा प्रकार निराळा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 2:08 am

Web Title: forest dd70
Next Stories
1 मनोवेध : एकाग्रता ध्यान
2 मनोवेध : रसिकतेसाठी साक्षीभाव
3 कुतूहल : पर्यावरण आणि हवामान
Just Now!
X