जेजुरी वार्ताहर
पुरंदर तालुक्यात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज एकूण रुग्णांची संख्या १८६ झाली. जेजुरीतील हाय रिस्क संपर्कातील एका ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे आता तालुक्यातील मृतांची संख्या ६ झाली आहे तर जेजुरीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. या मध्ये एका सात वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.
जेजुरीत करोनाचे रुग्ण सापडल्याने गुरुवारपासूनच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच दिवसांचा लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात करोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी तालुक्यातील जनतेने करोनाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व नियम पाळावेत असे आवाहन केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 9:41 pm