पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ११७७ रुग्ण आढळल्याने ७१ हजार ५०३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ६८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११४२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५५ हजार १०० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत ९९० जणांना करोनाची बाधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ९९० जण करोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी, ७१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १३ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात तब्बल १ हजार २१९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ४८४ वर पोहचली असून पैकी २३ हजार ६७२ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.