पुठ्ठा खोके  (कोरुगेटेड बॉक्स) तयार करण्यासाठीच्या कागदाच्या लगद्याची चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याचा फटका देशातील पुठ्ठा खोक्याच्या उत्पादनाला बसला आहे.

खोका तयार करण्यासाठीच्या कागदाचे दर गेल्या चार महिन्यांत जवळपास ७० टक्क्यांनी वाढले आहेत, त्यात दररोजच वाढ होत आहे. कागदाच्या तुटवड्यामुळे खोक्यांच्या उत्पादनावरच परिणाम होऊन देशातील उद्योग क्षेत्राची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे चीनला होणारी कागदाच्या लगद्याची निर्यात थांबवण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

Gold Silver Price on 19 April 2024
Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

गेल्या चार महिन्यांमध्ये पुठ्ठा तयार करण्यासाठीच्या कागदाच्या दरात ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. चीनला कागदाच्या लगद्याची होणारी निर्यात हे त्यामागील मोठे कारण असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चीनकडून हार्डवेस्टऐवजी केवळ लगदा घेतला जातो. या लगद्यावर प्रक्रिया करून पुठ्ठा खोक्याचा कागद तयार के ला जातो.

करोनाच्या काळात पुठ्ठा खोके  उत्पादकांनी धोका पत्करून काम के ले. आरोग्य क्षेत्रासह विविध उद्योग क्षेत्रांना पुठ्ठा खोका पुरवण्यात आला. मात्र गेल्या चार महिन्यांमध्ये कागदाच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. तसेच प्रचंड मागणी असताना कागदाच्या तुटवड्यामुळे आवश्यक तितके  उत्पादनही करता येत नाही. त्याशिवाय डिझेलच्या दरवाढीमुळे एकू ण उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र ग्राहकांकडून वाढीव दरानुसार खरेदी के ली जात नाही. पुठ्ठा खोके  खरेदी करणारे मोठे उद्योग असल्याने त्यांचा या उत्पादन क्षेत्रावर दबाव आहे. त्यामुळे पुठ्ठा खोके  उत्पादकाला त्याचा मोठा फटका बसत आहे, असे गांधी यांनी सांगितले.

थोडी माहिती…

हार्डवेस्टपासून (टाकू न दिलेले खोके ) लगदा तयार केला जातो. लगद्यातून क्राफ्ट पेपर तयार केला जातो. क्राफ्ट पेपरपासून पुठ्ठा खोके तयार केले जातात. देशभरात पुठ्ठा खोका उत्पादन हा मोठा उद्योग आहे. करोनाकाळात तातडीची गरज म्हणून खाटा तयार करण्यासाठीही पुठ्ठा खोक्यांचा वापर करण्यात आला होता.

गडकरींकडे निवेदन

केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून चीनला होणारी कागदाच्या लगद्याची निर्यात थांबवली पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले होते. आता गेल्या दोन महिन्यांमध्ये आणखी दरवाढ झाली असल्याने उत्पादन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गडकरी यांची भेट घेऊन या विषयात लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

कारण काय?

देशातील एकू ण उत्पादनाच्या ३० टक्के  लगदा चीनला निर्यात होत आहे. तसेच कं टेनरच्या अनुपलब्धतेमुळे अमेरिके तून येणारा हार्डवेस्ट सध्या बंद आहे. चीनने अमेरिके कडूनही कागदाचा लगदा घेण्यास सुरुवात के ली आहे. या सगळ्याचा परिणाम देशातील पुठ्ठा खोक्यांच्या उत्पादनावर झाल्याची माहिती वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅ क्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष कीर्तिकु मार गांधी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

उलाढाल वीस हजार कोटींची : वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅ क्चरर्स असोसिएशनचे राज्यभरात ५५० नोंदणीकृत सदस्य आहेत, तर नोंदणीकृत नसलेले सुमारे दोन ते अडीच हजार व्यावसायिक आहेत. प्रत्येक उद्योजक किमान वीस ते चाळीस जणांना रोजगार देतो. राज्यातील पुठ्ठा खोका उत्पादनाची उलाढाल सुमारे वीस हजार कोटींच्या घरात आहे.