News Flash

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड

ईडीकडून चौकशी सुरु

संग्रहित (courtesy: http://www.abilgroup.com)

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यवसायिक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कार्यालयात पोहोचले. ईडीकडून अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे. अविनाश भोसले यांची याआधी नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसंच आयकर विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती.

अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नालीचा विवाह दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याशी विवाह झाला आहे. ईडीने याप्रकरणी त्यांनाही दोन आठवड्यांपूर्वी नोटीस पाठवली असल्याचं वृत्त होतं. विश्वजीत कदम यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 1:46 pm

Web Title: ed raid on pune builder avinash bhosale svk 88 sgy 87
Next Stories
1 सांस्कृतिक नगरी पूर्वपदावर
2 वनविभागाकडून शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना
3 ‘आरटीई’ची शुल्क प्रतिपूर्ती थकल्याने खासगी शाळांचा बहिष्कार?
Just Now!
X