News Flash

पुन्हा एकदा कलाकारांचा कट्टा भरावा

कट्टय़ावर चित्रकला, गायन-वादन, कविसंमेलने रंगेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत दामले यांची भावना

पुणे : करोनामुळे थांबलेल्या कलाकारांच्या गप्पा आणि रसिकांना आनंद देणाऱ्या कला सादरीकरणाचा कट्टा पुन्हा एकदा लवकर भरावा, अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी शुक्रवारी प्रदर्शित केली. या कट्टय़ावर चित्रकला, गायन-वादन, कविसंमेलने रंगेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात उभारलेल्या कलाकार कट्टा आणि कलासंगम शिल्पाचे उद्घाटन दामले यांच्यासह ज्येष्ठ कथक नृत्यगुरु मनीषा साठे आणि प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी दामले बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजप युवा मोर्चाच्या युवती अध्यक्षा प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच महापालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालणारी केंद्रेही उभारायला हवीत. कलाकार कट्टा आणि कलासंगम शिल्पाद्वारे कलेचे वैविध्यपूर्ण दर्शन तर घडेल आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल.

या रस्त्याला आणि चौकाला कलाकारांची एक परंपरा आहे. देव आनंद, गुरुदत्त, डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल, नसिरुद्दीन शाह यांच्यासह अनेक कलाकार येथे असत. मुंबईतील काळा घोडा फेस्टिवलप्रमाणे पुण्यातही या कट्टय़ावर कला सप्ताह घेण्याचा मानस आहे.

– ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका, प्रभाग क्र. १४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 9:57 am

Web Title: marathi actor prashant damle attended kalakar katta in pune zws 70
Next Stories
1 पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी करोनाबाधित
2 पुणे रेल्वे स्थानकात मत्स्यालयाचा आनंद
3 ‘जरंडेश्वर’ विक्रीतील गैरव्यवहार सिद्ध करा!
Just Now!
X