पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १२४९ नवे रुग्ण आढळल्याने, ६३ हजार २८६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११६८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ४४ हजार ७७४ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९६९ करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात सर्वाधिक १ हजार १२१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ७८ वर पोहचली असून पैकी १८ हजार ७९४ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात ४ हजार ८२७ सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.