News Flash

दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज

उन्हाचा चटका आणि उष्णतेची लाट कायम

(संग्रहित छायाचित्र)

उन्हाचा चटका आणि उष्णतेची लाट कायम

राज्यात सर्वच ठिकाणची तापमानवाढ कायम असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी पुढील दोन दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ढगाळ स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाली होती. मात्र, कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत पुन्हा वाढले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदविली गेली. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोकण विभागातही कमाल तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. इतर ठिकाणचे तापमान ४२ ते ४५ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडय़ात परभणीचे तापमान ४५.६ अंशांवर गेले असून, इतर ठिकाणीही तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. पुण्याचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. महाबळेश्वरचे तापमानही सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ अंशांनी वाढले आहे. कोकण विभागात मुंबई, अलीबाग, रत्नागिरीतील तापमानही सरासरीच्या तुलनेत काहीसे पुढे गेले आहे.

राज्यात ३ आणि ४ जून रोजी ठिकठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडय़ातील लातूर जिल्ह्यमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात इतर ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:55 am

Web Title: rainfall in pune
Next Stories
1 माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा मेक्सिकोच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव
2 जखमी बिबट मादीला तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3 पुणे – SP’s बिर्याणीमध्ये अळ्या, व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X