News Flash

पुणे : त्या शाखा अध्यक्षांना करता येणार राज ठाकरेंचा ‘मनसे’ पाहुणचार

प्रत्येक महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे कामाचा आढावा घेणार

पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. जो शाखा अध्यक्ष चांगलं काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायलाय जाणार आहोत, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं आहे. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचं दिसत आहे.

“प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून, शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच जो शाखा अध्यक्ष चांगल काम करेल, त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना सांगितले आहे. याशिवाय, प्रत्येक महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे कामाचा आढावा देखील घेणार आहेत. ” अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुणे दौर्‍यावर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसाच्या पुणे दौर्‍यावर आहेत. या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत संवाद साधला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिकनंतर आता राज ठाकरे पुण्यात; पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु

या बैठकीबद्दल शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की,  ”आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी कामाला सुरुवात करावी. प्रत्येक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवा, पक्षात काम करताना कायम सकारात्मक भावनेतून काम करा., अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

“राज ठाकरेंना कळकळीची विनंती, अमित ठाकरेंकडे ‘मनविसे’चं अध्यक्षपद द्यावं”

तसेच, आताच्या सरकारला लॉकडाउन हवा असं वाटतं, तुम्हाला काम करून द्यायचे नाही. कायम तुम्हाला लॉकडाउनमध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे या मानसिकतेतून आपण बाहेर पडून, जनतेच्या प्रश्नावर लढले पाहिजे. असे सांगून, सर्वांनी कामास सुरुवात करण्याचे आदेशही यावेळी राज ठाकरेंनी दिले असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 4:45 pm

Web Title: raj thackeray will go for lunch to the house of the branch president who will do a good job msr 87 svk 88
टॅग : Mns,Raj Thackeray
Next Stories
1 पुणेः बीटकॉईनपेक्षा जास्त पैसे देण्याचा दावा करत इंजिनियरची केली १५ लाखांची फसवणूक
2 फडणवीस पुण्याचे शिल्पकार; होर्डिंगवरून ट्रोल
3 स्पर्धा परीक्षार्थीच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सुयोग अ‍ॅप’
Just Now!
X