पुणे शहरात दिवसभरात नव्याने ३९१ रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४५७ करोनाबाधितांची नोंद झाली. जिल्ह्यातील या दोन्ही प्रमुख शहरांमधील आजची संसर्गाची आकडेवारी ही गेल्या काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत कमी असल्याने ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ७९० पोहोचली आहे. तर दिवसभरात ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ९१७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ३१ हजार २७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ४५७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८३३ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजार ९२३ वर पोहचली असून यांपैकी ७४ हजार ५०४ जण करोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, सध्या महापालिकेच्या रुग्णालयात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४५१ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली.