४९०४ जागांसाठी ११ हजार उमेदवार निवडणूक रिंगणात

पुणे : जिल्ह्य़ातील ७४६ ग्रामपंचायतींपैकी ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध, तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. परिणामी उर्वरित ६५० ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांसाठी शुक्रवारी (१५ जानेवारी) मतदान होणार आहे.

या निवडणुकांमध्ये ४९०४ जागांसाठी ११ हजार सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पुणे महापालिके त समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी तीन गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची के वळ औपचारिकता राहिली आहे. वडाची वाडी आणि औताडे-हांडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, शेवाळवाडी ग्रामपंचायतीत एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने १५ जानेवारीला मतदानाच्या दिवशी शिरूर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील आठवडे बाजार भरवण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मज्जाव के ला आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर १४, १५ आणि १८ जानेवारी हे तीन दिवस मद्यालये, मद्यविक्री बंद राहणार आहे. ग्रामपंचायत परिसरातील हॉटेल, ढाबे यांची तपासणी करण्यात येणार आहे.

करोनाविषयक नियमांचे अधिकाऱ्यांकडून उल्लंघन

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना प्रसृत के ल्या आहेत. मात्र, मतदान साहित्य वाटप करताना महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी न वापरणे, शरीर अंतराचे नियम न पाळता कामकाज के ल्याचे निदर्शनास आले आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कामकाजाचे के ंद्र करण्यात आले आहे. या ठिकाणी हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला.