पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (एक्साइज) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एक हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. १८२ वाहने जप्त करण्यात आली असून, पाच कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,

निवडणूकीच्या काळात दारू विक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य, जिल्ह्यातून अवैधरित्या दारू वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. एक ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १८ तात्पूरते तपासणी नाके उभारून कारवाई केली जात आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील गावठी दारु निर्मिती वाहतूक, विक्री, तसेच धाबे, बेकायदा ताडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्याती सराइत दारु विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (पर्सनल बाँड) घेण्यात येत आहेत. आतापर्यंत १२ प्रकरणात ११ लाख ८० हजार रुपये एवढ्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. विशेष मोहिमेत गोव्यात तयार करण्यात आलेल्या मद्याची विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

हेही वाचा – महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

हेही वाचा – प्रचाराचा प्रवास… तालीम ते गुन्हेगारी टोळ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्क अंमलबजावणी आणि दक्षता सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.