बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच!

एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले असून सहकारी पोलीस कर्मचारी फरार बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने लाच घेतल्याच प्रकरण पुढे आलं आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके यांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. तर, पोलीस कर्मचारी अशोक बाळकृष्ण देसाई हा एसीबीच्या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन तिथून पळ काढला आहे. दोघांनी ऐकून १ लाख लाच […]

एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले असून सहकारी पोलीस कर्मचारी फरार

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने लाच घेतल्याच प्रकरण पुढे आलं आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके यांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. तर, पोलीस कर्मचारी अशोक बाळकृष्ण देसाई हा एसीबीच्या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन तिथून पळ काढला आहे. दोघांनी ऐकून १ लाख लाच मागितली होती. मात्र, तडजोडअंती ७० हजार आरोपींनी मागीतल्याच समोर आलं. ते घेत असताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय व्यक्ती विरोधात अर्ज आला होता. त्यात, त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याबाबत मजकूर होता. त्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके या करत होत्या. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी हेमा साळुंके आणि पोलीस कर्मचारी देसाई यांनी एक लाखांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तडजोडअंती सत्तर हजार द्यायचं ठरलं. दरम्यान, या प्रकरणाची माहिती ४२ वर्षीय तक्रारदार यांनी एसीबीशी संपर्क साधून सात दिवसांपूर्वी दिली. त्याची सविस्तर माहिती घेऊन गुरुवारी दुपार च्या सुमारास एसीबी ने तक्रारदारकडून देसाई हे लाच घेत असताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, एसीबी च्या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन पोलीस कर्मचारी देसाई लाचेच्या रककमेसह फरार झाला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके यांच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचारी देसाई यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क केला असल्याचं आणि लाच मागीतल्याच स्पष्ट झालं आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Acb arrested woman psi arrested for taking bribe in rape case in pune zws

ताज्या बातम्या