अजित पवार अजून बरेच दिवस राजकारणाच्या मध्यस्थानी राहतील, अशी परिस्थिती आहे. देशात अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घाबरतात. पण, अजित पवारांनी एकदा नाहीतर दोनदा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना ‘उल्लू’ बनवलं आहे, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अजित पवारांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेत, आपल्यावरील सर्व केसेस बंद केल्या. आता भाजपाला कुठे अजित पवार आपल्याबरोबर येणार असं वाटलं होतं. अमित शाहांनी अजित पवारांना गृहीत धरून लोकसभेच्या ४८ जागा लढण्याची तयारी दर्शवली होती. पण, आताही मोदी आणि शाहांना पुन्हा ‘उल्लू’ बनवलं आहे.”

हेही वाचा : “कोण नितेश राणे? त्याला अक्कल आहे का?”, ठाकरे गटाच्या नेत्याने फटकारलं, म्हणाले…

“देशात मोदी आणि शाहांना ‘उल्लू’ बनवण्याचं काम कोणी केलं असेल, तर त्यात अजित पवारांचं नाव घेता येईल,” असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

अजित पवार शरद पवारांना सोडतील का? हा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की, “सोडायचं की नाही याचं उत्तर अजित पवार देऊ शकतात. पण, ‘उल्लू’ बनवण्याचं राजकारण अजित पवारांनी केलं, हे नमूद करतो.”

हेही वाचा : “…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”, मनसे नेत्याचं मुंबईत विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचित आघाडी आणि ठाकरे गटाच्या एकत्र सभा कधी होणार? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हे मलाही माहिती नाही. पण, उद्धव ठाकरेंना ठरवायचं, की त्यांना महाविकास आघाडीबरोबर राहायचं आहे. अथवा वंचितला महाविकास आघाडीबरोबर सामील करून घ्यायचं आहे. नाहीतर महाविकास आघाडी सोडून वंचितबरोबर येणार आहेत. हा राजकीय निर्णय होणं बाकी आहे.”