पुणे : करोना संसर्गात सामान्य नागरिकांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे तसेच सामाजिक आणि राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे शनिवारी करण्यात आली. याबाबत पोलीस आयुक्तांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद देऊन राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. करोना काळात सर्वसामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारच्या निर्णयाप्रमाणे परिमंडळ उपायुक्तांमार्फत समिती स्थापन करून मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कॉँग्रेसकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा >>> सीबीएसई शाळांच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड

राज्य सरकारने याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी अद्याप सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेतलेले नाहीत, याकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. या मागणीचा सकारात्मक विचार करू तसेच येत्या तीन महिन्यात राजकीय, सामाजिक गुन्ह्यांची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demands withdrawal crimes against citizens in corona era pune print news rbk 25 ysh
First published on: 07-01-2023 at 21:21 IST