पुणे : दहावीतील विद्यार्थ्यांवर शिक्षिकेने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली.

याबाबत पीडित मुलाच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगा एका शाळेत दहावीत आहे. शुक्रवारी तो शाळेत दहावीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर अत्याचार केले. शाळेच्या आवारात शिक्षिकेने मुलावर अत्याचार केले, अशी फिर्याद पीडित मुलाच्या आईने दिली आहे.

हेही वाचा : बाणेरमध्ये लाचखोर तलाठ्यासह दोघांना पकडले, वारस नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलाच्या आईला याबाबतची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत.