पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी सात जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणी एकूण आरोपींची संख्या आता ११ झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती), जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चार आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सात आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील नववीत शिक्षण घेणार्‍या दोन अल्पवयीन मुली १४ सप्टेंबर रोजी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या दोघी हडपसर या ठिकाणी आल्यावर, आरोपी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी पीडित मुलींनी संपर्क साधला. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना सांगितले की, रूमवर दोन मुली आल्या आहेत. त्यानंतर त्याचे तीन मित्र रुमवर आले आणि त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारु पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितली.

हेही वाचा : चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबीयांची कोंडी; भाजपमधून ‘या’ दोन माजी नगरसेवकांचा विरोध, २० ते २५ नगरसेवक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलींच्या कुटुंबियांकडून आमच्याकडे आरोपींबाबत तक्रार येताच ज्ञानेश्वर भारत आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे आणि जय ऊर्फ जयेश अशोक मोरे या चार आरोपींना अटक करण्यात आली. या चारही आरोपींकडे अधिक तपास केल्यावर आणखी सात जणांनी त्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे सांगितले. ओंकार भारती, ओम कांबळे,आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सात आरोपींनी त्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सात आरोपींचा शोध घेतला जात असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सागितले.