Pune Breaking News Updates, 08 August 2025 : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी केली. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली.

पुण्यातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी बांधकामे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे खराब हवेचे दिवस वाढल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसांवर होत असलेल्या गंभीर परिणामांबाबत आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या शहरांतील व जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi

22:41 (IST) 8 Aug 2025

कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटते!; का म्हणाले असे उपमुख्यमंत्री अजित पवार?

मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली असता उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार चिडले. ...वाचा सविस्तर
22:01 (IST) 8 Aug 2025

आंदोलनातून भाजप कोणाला लक्ष्य करतेय ?

सामाजिक-राजकीय पटलावरील या नाट्यमय घडामोडीत खेवलकर यांचा रेव्ह पार्टीतील सहभाग आणि दर्शवले जाणारे पुरावे पाहता भाजपच्यावतीने याचा निषेध करण्यासाठी खेवलकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. ...वाचा सविस्तर
21:47 (IST) 8 Aug 2025

नव्याने ३१२ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिकांचे जाळे अन् मेट्रो लाईट मार्गिका! सर्वंकष गतिशीलता योजनेतील शिफारशी

पुणे महानगर प्रदेशासाठी (पीएमआर) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने ‘सर्वंकष गतिशीलता योजना’ (काॅम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार केली आहे. त्यामध्ये या शिफारशी करण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
21:34 (IST) 8 Aug 2025

सीबीएसईचे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक मॉडेल; २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षामध्ये राबवणार उपक्रम

सर्व सीबीएसई शाळांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हा डॅशबोर्ड मोफत उपलब्ध असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://cbsecareerguidance.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ...सविस्तर वाचा
21:34 (IST) 8 Aug 2025

शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीची सुटका; पुणे जिल्ह्यातील दौंडमधील घटना

उसाच्या शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात बिबट्याची मादी अडकली असल्याचे नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत शिंदे यांच्या सकाळी दहा वाजता ध्यानात आले. ...वाचा सविस्तर
21:25 (IST) 8 Aug 2025

मोठी बातमी ! MSEB करणार थकबाकीदार-वीजचोरांवर फौजदारी कारवाई ?

वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिले. ...वाचा सविस्तर
21:08 (IST) 8 Aug 2025

वाहतूक कोंडीमुक्तीसाठी एक लाख ३० हजार कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

वाहतूक कोंडीमुक्तीसाठी एक लाख ३० हजार कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ६२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
20:59 (IST) 8 Aug 2025

बेस्ट बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न; दुचाकी अपघातात ज्युनिअर आर्टीस्ट महिलेचा मृत्यू

या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या ५३ वर्षीय जुनिअर आर्टीस्ट महिलेचा मृत्यू झाला. गोरेगाव चेक नाका येथे हा अपघात झाला. आरे सब पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या २९ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर बातमी
20:37 (IST) 8 Aug 2025

कर्जमाफीसाठी शेतकरी करणार राज्यव्यापी आंदोलन; राजू शेट्टी, बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी संघटनांचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी संघटनांच्या वतीने पुण्यात ‘शेतकरी हक्क परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा निर्धार करण्यात आला. ...वाचा सविस्तर
20:27 (IST) 8 Aug 2025

हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली; मलब्याखाली दबून तीन जण ठार, तिघे गंभीर जखमी

आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले ...सविस्तर वाचा
19:53 (IST) 8 Aug 2025

करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली

करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आणि करारनाम्यामधील चुकीच्या अटी-शर्तींमुळे पुणे-मुंबई महामार्गातून राज्य शासनाला कोणताही आर्थिक फायदा झाला नाही, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...वाचा सविस्तर
19:38 (IST) 8 Aug 2025

वसईच्या कोळीवाड्यांत नारळीपौर्णिमेच्या सणाचा जल्लोष; समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण

शुक्रवारी वसई विरार मधील समुद्र किनारी आगरी कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमा सण धुमधडाक्यात साजरा केला आहे. ...सविस्तर वाचा
18:34 (IST) 8 Aug 2025

गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 8 Aug 2025

भिवंडी मेट्रो दुर्घटनाप्रकरणी सल्लागार सिस्ट्रावर हलगर्जीपणाचा ठपका; दुर्घटनेप्रकरणी पाच लाख रुपये दंड, चौकशीही सुरू

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक लाभाचे आरोप केल्याने चर्चेत आलेल्या फ्रान्समधील सिस्ट्रा कंपनीवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
18:23 (IST) 8 Aug 2025

मध्य रेल्वेवर धावणार रक्षाबंधन विशेष रेल्वेगाडी; बहीण-भावाचा प्रवास होणार सुकर

ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून नागपूर, कोल्हापूर, मडगाव दरम्यान १२ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
18:20 (IST) 8 Aug 2025

दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी त्वरित सुरू करा, अन्यथा ….

कोकणातील रत्नागिरी रायगड जिल्ह्यांतील सर्वच लहान - मोठ्या गावांतून सकाळी लवकर निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत आपली कामे आटोपून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता. ...अधिक वाचा
17:59 (IST) 8 Aug 2025

महिला आणि बालविकास योजन : पात्र महिलांना घरघंटी, शिलाई यंत्रांचे वितरण रखडले

महानगरपालिकेच्या जेंडर बजेटअंतर्गत महिला व बालकल्याण योजनेतून पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी व मसाला कांडप आदी यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात येते. ...सविस्तर बातमी
17:55 (IST) 8 Aug 2025

वीजचोरीचा अजब प्रकार! पुण्यातील एका उद्योजकाला १९ लाखांचा दंड

पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. ...सविस्तर बातमी
17:47 (IST) 8 Aug 2025

दोन दिवसांत ‘विकेट’ काढतो, पोलिसाला कुणी दिली धमकी?

याप्रकरणी हवालदाराने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इस्माईल सैफान भागानगरे (वय २३, रा. भोसरी) याला अटक केली आहे. ...वाचा सविस्तर
17:46 (IST) 8 Aug 2025

यंदा पाचवी, आठवीबरोबर चौथी व सातवीचीही शिष्यवृत्ती परीक्षा

राज्यातील अनेक जिल्हा परिषद, नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये बहुतांश शाळा इयत्ता चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतून बाहेर फेकले गेले. ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 8 Aug 2025

गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर; किती पदांची भरती? अर्ज भरण्याची मुदत काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
17:37 (IST) 8 Aug 2025

अंबरनाथच्या वेशीवर पुन्हा गोवंश हत्येची घटना; जांभूळ गावातील गुरचरणात जनावरांचे अवशेष, पोलिसांचा तपास सुरू

बदलापूर आणि अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यात गोवंश हत्या करून अवैधरित्या गोमांस विक्री केले जात असल्याचे समोर आले होते. ...सविस्तर वाचा
17:34 (IST) 8 Aug 2025

अमेरिकेतील डॉक्टर असल्याची बतावणी करून गाझामधील खोटी कथा रचली… लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेची फसवणूक

युध्द सुरू असलेल्या गाझा सीमेवरून भारतात परतण्याच्या नावाखाली त्याने या महिलेकडून ६ लाख रुपये उकळले. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
17:31 (IST) 8 Aug 2025

तोडफोड करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे पोलिसांनी सूचना

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले. ...सविस्तर बातमी
17:25 (IST) 8 Aug 2025

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकांनी अडवली रुग्णवाहिकेची वाट

रुग्णवाहिका चालक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून पाटकर रस्त्याने शुक्रवारी सकाळी चालला होता. ...सविस्तर बातमी
17:24 (IST) 8 Aug 2025

नक्षलवाद्यांविरोधातील तपासावर प्रश्नचिन्ह? 49 गुन्ह्यांचे आरोप असलेल्या बिरजूवरील गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस अपयशी

गेल्या चार दशकाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्यात हिंसाचार करणाऱ्या नक्षल चळवळीची मागील तीन वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे. ...वाचा सविस्तर
17:24 (IST) 8 Aug 2025

नक्षलवाद्यांविरोधातील तपासावर प्रश्नचिन्ह? 49 गुन्ह्यांचे आरोप असलेल्या बिरजूवरील गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस अपयशी

गेल्या चार दशकाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्यात हिंसाचार करणाऱ्या नक्षल चळवळीची मागील तीन वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे. ...वाचा सविस्तर
17:17 (IST) 8 Aug 2025

पुण्यात आणखी पाच पोलीस ठाणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले. ...अधिक वाचा
17:16 (IST) 8 Aug 2025

पुण्यात आणखी पाच पोलीस ठाणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले. ...अधिक वाचा
17:10 (IST) 8 Aug 2025

महामार्गावर चिंचोटी ते वसईफाटा वाहतूक कोंडी; घोडबंदर येथील कामाचा परिणाम 

घोडबंदर गायमुख रस्त्यावर ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केले आहे. ठाण्याच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही चिंचोटी भिवंडी या मार्गावरून वळविली आहेत. ...सविस्तर वाचा

Today’s Nagpur Mumbai Pune News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज ८ ऑगस्ट २०२५