Mumbai Breaking News Updates : मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका सोमवारी दुपारी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला बसला. आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील एका बांधकाम प्रकल्पावरील एक प्लास्टिक शीट उडून ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील ओव्हरहेड इलेक्ट्रीकल लाईनवर पडली. त्यामुळे मेट्रो सेवा बंद पडली होती. तर आता मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आला. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 16 June 2025

22:30 (IST) 16 Jun 2025

पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन आणि प्रवेश प्रक्रियेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
22:15 (IST) 16 Jun 2025

शहरात मुसळधार, पण धरणात प्रतीक्षा, धरणांमध्ये ८.६० टक्के पाणीसाठा

पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे मध्य वैतरणा धरणातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. ...सविस्तर बातमी
20:50 (IST) 16 Jun 2025

शाळा कधी सुरू होणार? नवीन तारीख आणि वेळ जाहीर; सर्वच शाळांसाठी लागू…

नव्या शैक्षणिक सत्रातील शाळा कोणत्या दिवशी सुरू करायच्या, याचे नेमके आदेश शाळांना प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ...सविस्तर बातमी
20:49 (IST) 16 Jun 2025

मोबाईलमध्ये आढळली १३ हजार मुलींची छायाचित्रे, शेकडो मुलींचा लैंगिक छळ करणारा विकृत गजाआड

एआयद्वारे (कृत्रिम बुध्दीमत्ता) तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे मुलींना धमकावून तो अश्लील संभाषण (न्यूड व्हिडियो कॉल) करण्यास भाग पाडत होता. ...सविस्तर वाचा
20:25 (IST) 16 Jun 2025

प्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘सारस’ची गणना, गोंदिया जिल्ह्यात ३६ पक्ष्यांची नोंद

गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ सारस पक्ष्यांची गणना सोमवारी करण्यात आली. यावर्षी ३६ पक्षी आढळले असून, मागील दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या लक्षणीय वाढली आहे. ...सविस्तर बातमी
20:01 (IST) 16 Jun 2025

सात शैक्षणिक पदव्यानंतरही वर्षानुवर्षे पदोन्नतीपासून वंचित, न्यायहक्कासाठी महापालिका कर्मचाऱ्याची उच्च न्यायालयात धाव

सुनील यादव यांना गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ एकही पदोन्नती मिळालेली नाही. अधिकृत निष्क्रियता आणि अपारदर्शक भरती प्रक्रियेला कंटाळून आपल्या न्यायहक्कासाठी यादव यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...अधिक वाचा
19:49 (IST) 16 Jun 2025

बच्चू कडूंबद्दल भास्कर जाधव यांनी केलेले भाकित सरकारने दोन दिवसात खरे ठरवले

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले. ...सविस्तर बातमी
19:12 (IST) 16 Jun 2025

पाच वर्षांपूर्वीच्या बनावट व्हिसामुळे फुटले बिंग, आखाती देशात प्रवास करणाऱ्याला अटक

युएईचा बनावट व्हिसा तयार करून परदेशात प्रवास करणार्या एका इसमाला सहार पोलिसांनी अटक केली. त्याने पाच वर्षापूर्वी कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला होता. ...सविस्तर वाचा
18:57 (IST) 16 Jun 2025

सायकल वारी… पर्यावरण संवर्धन, प्रदूषण निर्मूलनाचा संदेश; पंढरपुरात होणार सायकल रिंगण

पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निर्मूलनाच्या संदेशासाठी राज्यभरातील ८५ पेक्षा अधिक सायकलस्वारांनी यंदा चौथ्या वर्षी ‘सायकल वारी’ उपक्रमांतर्गत रविवारी नागपूरहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. ...सविस्तर वाचा
18:56 (IST) 16 Jun 2025

सदनिकेचे कुलूप तोडून हडपसरमधे ३९ लाखांचा ऐवज चोरीला

शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने, हिरेजडित दागिने, रोकड असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. ...सविस्तर वाचा
18:44 (IST) 16 Jun 2025

कल्याण, डोंबिवलीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, खासगी शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी शालेय अभ्यासक्रमातील वस्तू, गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून स्वागत केले. यावेळी ढोल ताशांचा गजर करण्यात आला. ...वाचा सविस्तर
18:44 (IST) 16 Jun 2025

आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी नागपूर - मिरज चार विशेष रेल्वेगाड्या

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
18:11 (IST) 16 Jun 2025

कडोंमपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस, मध्यरात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत रुग्णालयातील त्रूटी उघड

डाॅ. लावणकर यांना अपघात विभागातील नियुक्त वैद्यकीय अधिकारी आणि विकी तेजा यांना नोटिस बजावण्यास सांगण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
18:10 (IST) 16 Jun 2025

अतिदुर्गम भामरागडमधील आदिवासी विद्यार्थ्यांची 'नीट'मध्ये गरुडझेप

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावांतील देवदास, सानिया आणि गुरुदास या तिघांनी नीट परीक्षेत यश मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. ...सविस्तर बातमी
18:00 (IST) 16 Jun 2025

अग्निशमन दलाला ६८ मीटर उंच शिडीच्या वाहनांची प्रतीक्षाच; वाहने निविदा प्रक्रियेत रखडली

आगीच्या दुर्घटनांमध्ये उंच इमारतींमधील मदतकार्य काही प्रमाणात सुलभ व्हावे, यासाठी अग्निशमन दलाने ६८ मीटर उंचीच्या शिडीची (टर्नटेबल लॅडर) चार वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ...अधिक वाचा
17:58 (IST) 16 Jun 2025

मान्सून उद्या राज्य व्यापणार, पण पेरणीची घाई नको…

मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी खात्याने ‘रेड अलर्ट’ देखील दिला आहे. ...अधिक वाचा
17:49 (IST) 16 Jun 2025

कामा रुग्णालयातील ‘आययूआय’मुळे दीड वर्षांत २१ जोडप्यांचे वंधत्व झाले दूर

गर्भधारणेसाठी अक्षम असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व उपचार देता यावेत यासाठी ६ मार्च २०२४ रोजी कामा रुग्णालामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात आले. वं ...सविस्तर वाचा
17:23 (IST) 16 Jun 2025

मर्कटलिलांमुळे मनुष्यवस्त्या धास्तावल्या…

गेल्या काही दिवसांपासून जंगलाच्या आसपास असलेल्या गृहसंकुलात माकडांचा शिरकाव झाल्याच्या अनेक तक्रारी प्राणीमित्र आणि तसेच वन विभागाकडे येऊ लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
16:15 (IST) 16 Jun 2025

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट.. बिहार, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात…

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. ...अधिक वाचा
16:03 (IST) 16 Jun 2025

तांत्रिक कारणांमुळे ‘मेट्रो १’ विस्कळीत; ओव्हरहेड इलेक्ट्रीकल लाईन्सवर ताडपत्री पडल्याने मेट्रो खोळंबली

आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील एका बांधकाम प्रकल्पावरील एक प्लास्टिक शीट उडून ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील ओव्हरहेड इलेक्ट्रीकल लाईनवर पडली. त्यामुळे मेट्रो सेवा बंद पडली ...अधिक वाचा
16:01 (IST) 16 Jun 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद शाळेत; म्हणाले, "प्रत्येक विद्यार्थ्याने…"

पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. ...सविस्तर बातमी
15:48 (IST) 16 Jun 2025

"…हा तर माझा गेम करण्याचा भाजपचा डाव", बच्चू कडूंचा पलटवार; म्हणाले "कारवाई सूडबुद्धीतून"

बच्चू कडू म्हणाले, भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 16 Jun 2025

सावधान! सायबर गुन्हेगारांची व्हॉट्सॲप ट्रॅफिक चलनाद्वारे फसवण्याची नवीन क्लृप्ति

सायबर गुन्हे करणारे आता बनावट लोगो, खरे दिसणारे संदेश आणि अगदी वैध वाहन नोंदणी क्रमांक वापरून वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नक्कल करत आहेत. ...वाचा सविस्तर
15:22 (IST) 16 Jun 2025

कुंडमळा पूल दुर्घटना : "डोळ्यांसमोर मृत्यू दिसत होता" मृत्यूच्या दाढेतून सुटलेल्या पती-पत्नीचा थरारक अनुभव

पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा येथे लोखंडी अरुंद पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. ५० पेक्षा अधिक जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...सविस्तर वाचा
15:16 (IST) 16 Jun 2025

अखेर मोसमी वाऱ्यांची आगेकूच; 'या' भागात मोसमी पावसाची प्रगती…

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. ...अधिक वाचा
15:04 (IST) 16 Jun 2025

Bachchu Kadu : धक्कादायक! जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू अपात्र; उपोषण स्थगितीनंतर लगेच…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह केला.

सविस्तर वाचा...

14:34 (IST) 16 Jun 2025

रस्त्यावरचे यमदूत उठले नागरिकांच्या जीवावर? विद्युत खांबाच्या धडकेत तरुण गंभीर….

या खांबांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. हे विद्युत खांब काढण्याची जबाबदारी कोणाची याचा वाद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणात यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ...वाचा सविस्तर
14:24 (IST) 16 Jun 2025

"बाळासाहेबांची ओळख हिंदूत्ववादी…", राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शंकराचार्यांचे मोठे विधान

शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहे. ...वाचा सविस्तर
14:13 (IST) 16 Jun 2025

आनंदवार्ता! रोजगारासाठी आता ‘प्लेसमेंट ड्राइव्ह’, खासगी क्षेत्रात नोकरी…

कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे १८ जून रोजी अकोल्यात 'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन करण्यात आले असून, विविध खासगी कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ...सविस्तर वाचा
13:20 (IST) 16 Jun 2025

दौंड पुणे डेमूच्या डब्यात आग; आरपीएफच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून येणारी ही गाडी सकाळी ७.५२ वाजता येवत स्थानकावर थांबली होती. ...अधिक वाचा

pune kundmala accident

पुणे कुंडमळा पूल दुर्घटना लाईव्ह न्यूज अपडेट्स