पुणे : सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठीआपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे लढा देणाऱ्या बँक, रेल्वे, विद्युत क्षेत्रातीलसर्व कामगार संघटना एकत्र येऊन लढा व्यापक करणार आहेत. याची सुरुवात पुण्यापासून होत असून रविवारी (१२ जून) पत्रकार भवन येथेसायंकाळी साडेपाच वाजता कृती योजना तयार करण्यासाठी आणिखासगीकरण थांबवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी बैठक होणारआहे.

ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक्स ऑफिसर्स असोसिएशन, ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन, सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर्स युनियन, कामगार एकता कमिटी, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटना, सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन या प्रमुख संघटनांनी या एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. रविवारीआयोजित बैठकीस बँक, रेल्वे, विद्युत क्षेत्रातील विविध संघटनांचेशंभराहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीकामगार एकता कमिटीचे प्रदीप यांनी गुरुवारी दिली.

खासगीकरण हे केवळ संबंधित कामगारांच्या हिताच्या विरोधात नाही.तर, त्या उपक्रमाच्या सेवा वापरणाऱ्या सर्वांवरही त्याचा विपरितपरिणाम होतो. खासगीकरणामुळे जास्तीत जास्त नफा मिळतो आणिपरिणामी सेवांच्या किमती वाढतात. या वाढीव किमती उपभोक्त्यांच्याहिताविरोधात आहेत. त्यामुळे रेल्वे, वीज, बँकिंग, विमा, दूरसंचार, संरक्षण उत्पादन, आरोग्य सेवा, पोलाद, कोळसा आणि पेट्रोलियम अशा विविध क्षेत्रातील कामगार एकत्र येऊन खासगीकरणाला विरोध करणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे संजय ठाकूर आणि पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे शैलेश टिळेकर यांनी सांगितले.