पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांना इतकं आजारी असताना भाजपाने प्रचारात का उतरवलं म्हणून टीकाही झाली होती. आता त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याबाबत काही वेळाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात येणार आहे.

काय म्हटलं आहे डॉक्टरांनी?

गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातलं डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुसरं मेडिकल बुलेटीन देण्यात येणार आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?
ulhasnagar firing case marathi news, mla ganpat gaikwad marathi news
आमदार गणपत गायकवाड यांच्या फरार मुलाचा अंतरिम जामीन न्यायालयाने फेटाळला

डिसेंबर २०२२ मध्येही करण्यात आलं होतं रूग्णालयात दाखल

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून खालावली आहे. गिरीश बापट यांना श्वसनाचा त्रास होतो आहे. याआधी डिसेंबर २०२२ मध्येही गिरीश बापट यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कसबा पेठ पोट निवडणूक पार पडली तेव्हा या निवडणुकीच्या प्रचारात त्यांना व्हिल चेअरवरून आणण्यात आलं होतं. तसंच त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने नाकात नळीही लावण्यात आली आहे. त्यांना या अवस्थेत पाहून अनेक भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची काळजी वाटली होती. आता याच गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते दूर आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळीही त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रचारात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र बापट यांनी एक दिवस प्रचारात उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी बापट यांची भेट घेतली होती.

मोहन जोशी यांचा पराभव करून झाले खासदार

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. १९९५ पासून सलग पाचवेळा गिरीश बापट आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशी यांना पराभवाची धूळ चारत ते खासदार झाले.

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात त्यांच्या ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याची हातोटी गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सगळ्यांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर झाला आहे.