काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरपासून अप्पा बळवंत चौक मार्गे दुचाकी फेरी काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते आणि आशिष महादळकर यांच्याकडे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणूक: ” मला अजित पवार नाही, तर जनता आमदार करणार”; बंडखोर नेते राहुल कलाटेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

काँग्रेसचे ४० वर्षांपासून काम करत आहे. पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पोटनिवडणुकीत विजयी होईन, असा विश्वास बाळासाहेब दाभेकर यांनी व्यक्त केला. दाभेकर यांनी बंडखोरी केल्याचा फटका काही प्रमाणात काँग्रेसला बसेल, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दाभेकर अर्ज माघारी घेणार का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.