विनामास्क कार चालवणाऱ्या केकेआर संघाच्या राहुल त्रिपाठीवर दंडात्मक कारवाई!

सासवड येथून खडकीकडे जात असताना पुणे पोलिसांकडून कारवाई

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. जर एखादा व्यक्ती विनामास्क फिरताना दिसल्यास पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. आज (शुक्र) दुपारच्या सुमारास पुण्यात के के आर संघाचा खेळाडू राहुल त्रिपाठी हा कारमधून  विनामास्क जात होता. त्यावेळी त्याच्यावर कोंढवा पोलिसांनी ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली.

या कारवाई बद्दल कोंढवा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष सोनावणे म्हणाले की, ”कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आम्ही विना मास्क फिरणार्‍या नागरिकावर कारवाई करीत होतो. त्यावेळी चार चाकी वाहनातून एक व्यक्ती विना मास्क असल्याचे दिसून आले. ”मी केकेआर संघाकडून खेळत असून माझ नाव राहुल त्रिपाठी आहे.” असं त्यांनी सांगितलं. त्यावर आम्ही एवढच म्हटलं की, आपणास दंड भरावा लागेल आणि त्यानंतर त्याने ५०० रुपयांचा दंड भरला.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punitive action against rahul tripathi of kkr team for driving a car without mask msr 87 svk

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या