शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पुणे शहरातील हडपसर भागात रस्त्यावर हातगाडीधारकांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि क्षेत्रीय अधिकाऱ्याचा चुकीच्या कारभार याविरोधात शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात भाजीपाल्याची हातगाडी नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे शहरातील हडपसर भागात रस्त्यावर हातगाडीधारकांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि क्षेत्रीय अधिकाऱ्याचा चुकीच्या कारभार याविरोधात शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात भाजीपाल्याची हातगाडी नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून हडपसर परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांवर वाढत अतिक्रमण, क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा बंद आहे.
या मागण्यांबाबत यापूर्वीदेखील निवेदन देण्यात आले. मात्र तरीदेखील अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच काही अधिकारी, कर्मचारी पथारीधारकांकडून पैसे घेऊन हातगाड्या लावण्यास परवानगी देत आहेत. या गैरकारभाराचे पुरावे देऊनदेखील संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आज आंदोलन करीत आहोत. येत्या आठ दिवसांमध्ये आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, कार्यवाही केली न गेल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.