MSBSHSE 10th Result Live Updates : पुणे : अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा दहावीच्या पारंपरिक पद्धतीने झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ३.११ टक्क्यांनी घटला असून मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता यंदाचा निकाल १.४७ टक्क्यांनी कमी आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होते.

यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९२.०५ टक्के आहे. १५१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १ लाख ९ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.

दृष्टिक्षेपात निकाल

नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ४१ हजार ६६६
परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख २९ हजार ९६
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – १४ लाख ३४ हजार ८९८

निकालाची टक्केवारी – ९३.८३

पुनर्परीक्षार्थी नोंदणी – ३७ हजार ७०४

परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी – ३६ हजार ६४८

उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – २२ हजार ३२०

पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ६०.९०

खासगी विद्यार्थी नोंदणी – २१ हजार २१६

परीक्षा दिलेले खासगी विद्यार्थी – २० हजार ५७४

उत्तीर्ण झालेले खासगी विद्यार्थी – १५ हजार २७७

खासगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ७४.२५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियमित आणि पुनर्परीक्षार्थी एकत्रित निकालाची टक्केवारी – ९३.०६