पुणे : पुरंदर येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण या भागातील लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार सुळे यांना वेळेवर देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून केवळ चार तास अगोदर या कार्यक्रमाचे निमंत्रण मला देण्यात आले. त्यामुळे इच्छा असूनही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक उशीरा निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून सुळे  यांनी राज्यात सत्ताधारी म्हणून काम करणारे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हे सरकार दडपशाही करणारे सरकार असून संविधानाची मूल्य बाजूला ठेवून असे उद्योग केले जात असल्याची टीकाही खासदार सुळे यांनी केली आहे. आपल्या एक्स अकाउंट वर याबाबत पोस्ट करून त्यांनी आपली नाराज व्यक्त केली आहे.

Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Vanraj Andekar murder case, pistol, Vanraj Andekar,
वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल पुरविणारा सराइत गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
Odisha army officers fiance sexual assault news
Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”
Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा

हेही वाचा >>>पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

पुरंदर येथे नवीन प्रशासकीय भवन व्हावे, यासाठी माझ्यासह पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रचंड पाठपुरावा केला. या इमारतीचे आज सायंकाळी लोकार्पण होत आहे.  याचा अतिशय आनंद आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्याची इच्छा होती. परंतु पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून केवळ चार तास अगोदर या कार्यक्रमाचे निमंत्रण मला देण्यात आले. थोडक्यात इच्छा असूनही आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी शासनाची इच्छा दिसते.

आम्ही विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी देत नाही. विकासकामांना कात्री लावता आणि आता ‘ निती, नियम, निकष’ आणि लोकशाहीतील सगळे संकेत बाजूला ठेवून सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होऊ नये, अशी व्यवस्था करता. असे प्रकार केवळ दडपशाहीत होऊ शकतात. विद्यमान सरकार संविधानाची मूल्ये बाजूला ठेवून दडपशाही करीत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.