scorecardresearch

Premium

आयआरसीटीसीचा घोळात घोळ! रेल्वेने अखेर केला ‘हा’ उपाय

या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक आणि कोल्हापूर स्थानकावर प्रत्येकी एक अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली.

irctc website down tuesday technical glitch pune
आयआरसीटीसीचा घोळात घोळ! रेल्वेने अखेर केला 'हा' उपाय (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे: रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी असलेले इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. हा बिघाड साडेदहा तासानंतर दूर करण्यात अखेर यश आले. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक आणि कोल्हापूर स्थानकावर प्रत्येकी एक अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली.

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि उपयोजन (ॲप्लिकेशन) मंगळवारी पहाटे २ वाजून ५६ मिनिटांनी बंद पडले. तांत्रिक बिघाडामुळे हे घडले होते. यावर अखेर दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी उपाययोजना करण्यात यश आले. त्यानंतर संकेतस्थळ आणि उपयोजन सुरू झाले. तिकीट आरक्षण यंत्रणा बंद असल्याने आयआरसीटीसीने ॲमेझॉन आणि मेकमायट्रीपसह इतर ठिकाणी तिकीट नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली होती.

special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
Railway block for technical works
तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द
safale railway cross fatak
सफाळे रेल्वे फाटक बंदमुळे गैरसोय; पूर्वसूचनेबाबत नागरिक अनभिज्ञ
trains Nagpur cancelled
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूरमार्गे धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या रद्द, वाचा सविस्तर…

हेही वाचा… पुणे : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

संकेतस्थळ बंद असलेल्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागात पुणे स्थानकावर एक अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली. त्यामुळे पुणे स्थानकावर आठ तिकीट आरक्षण खिडक्या सुरू होत्या. त्याचवेळी कोल्हापूर स्थानकावर एक अतिरिक्त खिडकी सुरू केल्याने तिथे दोन खिडक्या कार्यरत होत्या. पावसाळ्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी असल्याने तुरळक संख्येने प्रवासी या खिडक्यांसमोर दिसून आले.

पावसाळ्यामुळे सध्या प्रवाशांची फारशी गर्दी नाही. त्यामुळे आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद झाल्याचा फारसा फटका बसल्याचे दिसून आले नाही. पुणे स्थानक आणि कोल्हापूर स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आल्या. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The irctc website was down on tuesday due to a technical glitch pune print news stj 05 dvr

First published on: 26-07-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×