पुणे : महाविद्यालयात किंवा विद्यापीठात र्रँगग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञापत्र देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बदल केला आहे. तसेच महाविद्यालये, विद्यापीठांना प्रवेश अर्जात ‘र्रँगग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र संदर्भ क्रमांक’ हा नवीन रकाना उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  यूजीसीने नव्या कार्यपद्धतीतील बदलाची माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.

यूजीसीच्या र्रँगग प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात http://www.antiragging.in  आणि http://www.amanmovement.org  या संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज भरून द्यावा लागतो. मात्र या प्रक्रियेतील ताण कमी करण्यासाठी यूजीसीने कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना याच दोन संकेतस्थळावरील र्रँगग प्रतिबंधात्मक नियमावली वाचून आणि समजून घेऊन स्वत:ची माहिती भरावी लागेल. त्यानंतर विद्याथ्र्याला त्याच्या ई-मेलवर नोंदणी क्रमांक आणि एक दुवा लिंक प्राप्त होईल.

विद्याथ्र्याला तो दुवा त्याच्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील समन्वयक अधिकाऱ्याला पाठवावा लागेल. महाविद्यालय, विद्यापीठातील समन्वयक अधिकाऱ्याला आलेल्या त्या दुव्याद्वारे विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची माहिती उपलब्ध होईल. प्रत्येक २४ तासांनी विद्यार्थ्यांची यादी अद्ययावत होईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

बदल काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करताना यूजीसीने महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांच्या प्रवेश अर्जात एक बदल करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महाविद्यालय, विद्यापीठांनी प्रवेश अर्जात ‘र्रँगग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र संदर्भ क्रमांक’ हा नवीन रकाना उपलब्ध करून द्यायचा आहे. तसेच महाविद्यालयातील प्रवेश कक्ष, शैक्षणिक विभाग, उपाहारगृह, ग्रंथालय आदी ठिकाणी र्रँगग प्रतिबंधक समन्वयक अधिकाऱ्याचा ई-मेल आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे