भारतात स्मार्टफोन निर्मात्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. यासह आता Redmi च्या हायपर चार्जर स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी Realme ने आपला स्मार्टफोन सादर केला आहे. Realme GT Neo 2 नंतर आता कंपनी Realme GT Neo 3 सादर करणार आहे. त्याचे स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. ५ मिनिटांत बॅटरी ५० टक्के चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये 4500mAh आणि 5000mAh बॅटरी 150W आणि 80W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाईल. दुसरीकडे, रेडमी हायपर चार्जर फोनबद्दल बोलताना Xiaomi कंपनीने १७ मिनिटांत १०० टक्के बॅटरी चार्ज करण्याचा दावा केला आहे. Realme GT Neo 3 ची नेमकी लॉन्च तारीख उघड करण्यात आलेली नाही, परंतु कंपनी हा फोन या महिन्यात लॉन्च करू शकते. Realme MWC 2022 मध्ये MediaTek Dimensity 8100 SoC सुविधा आहे. तसंच, हे स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. कंपनी या फोनमध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान देखील जोडू शकते. कंपनीचे CMO, Xu Qi चेस यांनी अधिकृतपणे Weibo वर Realme GT Neo3 चे पोस्टर शेअर केले आहे आणि त्यात दोन बॅटरी प्रकार असतील, अशी माहिती दिली आहे. 80W चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000 mAh ची बॅटरी पॅक करण्याची आणि वजन 188 ग्रॅम असण्याची शक्यता आहे. आणखी वाचा : Realme 9 5G, Realme 9 SE 5G स्मार्टफोनचा भारतात पहिला सेल सुरू, जाणून घ्या हा फोन कसा खरेदी करायचा? याव्यतिरिक्त Realme चे CEO माधव सेठ यांनी देखील मार्चमध्ये MWC 2022 मध्ये Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro च्या जागतिक लॉन्चची खात्री केली आहे. पण, सेठ यांनी २०२२ च्या पहिल्या सहामाहीत GT Neo 3 चे आगमन होण्याचे संकेत दिले. Realme GT Neo 2 चीनमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. म्हणजेच रिअलमीचा हा फोन या महिन्यापासून ते सप्टेंबर या महिन्यात कधीही लॉन्च होऊ शकतो. विशेष वैशिष्ट्येस्मार्टफोनमध्ये RMX3560 आणि RMX3562 असे दोन बॅटरी पर्याय असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये 150W फास्ट चार्जिंगसह 4,500 mAh आणि 80W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. आणखी वाचा : Redmi Note 11 Pro+ 5G आणि Redmi Watch 2 Lite चा पहिला सेल सुरू, जाणून घ्या किती मिळतोय डिस्काउंट संभाव्य स्पेसिफिकेशनकंपनीने या स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु लीक झालेल्या डेटानुसार, स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह ६.७ इंच फुलएचडी+ एमोलेड स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे. हे Android 12 वर चालू शकते. तसेच, Realme GT Neo3 तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो, ज्यामध्ये 8GB+128GB, 128GB+256GB आणि 128GB+512GB समाविष्ट असू शकतो. कॅमेराकॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. हे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP फ्रंट शूटरसह येऊ शकते.