scorecardresearch

Premium

टोमॅटो, दही, दुध व गॉगल.. अंतराळात जगण्यासाठी आणि काय हवं? स्पेस स्टेशनवर NASA पाठवणार ‘या’ वस्तू

What Does Astronaut Eat In Space: अंतराळवीरांच्या आहारासाठीच नव्हे तर एका खास प्रयोगासाठी हे टोमॅटो अंतराळात धाडण्यात येणार आहेत.

What Does Astronaut Eat In Space NASA Sends Mission to International Space Station Via Elon Musk SpaceX
टोमॅटो, दही, दुध व गॉगल.. अंतराळात जगण्यासाठी आणि काय हवं? स्पेस स्टेशनवर NASA पाठवणार 'या' वस्तू (फोटो : ट्विटर/PiXabay)

What Does Astronaut Eat In Space: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) बुधवारी २३ नोव्हेंबरला (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) साठी आवश्यक वस्तू घेऊन एक मोहीम लाँच करणार आहे. एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीच्या फाल्कन ९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी आवश्यक वस्तू लोड केल्या जातील. अंतराळात असणाऱ्या दहा अंतराळवीरांसाठी SpaceX च्या २६ व्या पुनर्पुरवठा मिशनमध्ये अनेक वस्तू पाठवण्यात येणार आहेत. या वस्तू कोणत्या व त्यांची अंतराळवीरांना काय गरज असते? चला तर पाहुयात..

टोमॅटो

नासाचे शास्त्रज्ञ जियोया मस्सा यांनी सांगितले की, SpaceX च्या फाल्कन ९ मध्ये लोड करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये टोमॅटोचा समावेश आहे. अंतराळवीरांच्या आहारासाठीच नव्हे तर एका खास प्रयोगासाठी हे टोमॅटो अंतराळात धाडण्यात येणार आहेत. चेरी टोमॅटोचा प्रकार ‘रेड रॉबिन’ हा अंतराळात पिकवला जाऊ शकतो का हे तपासण्यासाठी काही नमुने पाठवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अगोदरच विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे पीक घेण्याचे प्रयोग सुरु आहेत. टोमॅटोचे पीक अंतराळात घेता येईल का, पीक घेतल्यास टोमॅटो खाण्यायोग्य असतील का तसेच या वनस्पतींवर सूक्ष्मजीवांची वाढ होणार का हे सर्व घटक या प्रयोगात तपासले जाणार आहे. ‘

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

दही व दूध

बायोन्यूट्रिएंट्स असणारे दही, केफिर म्हणून ओळखले जाणारे आंबवलेले दूध उत्पादन आणि यीस्ट-आधारित पेय एका इनक्यूबेटरसह पाठवले जाते ज्यामुळे आवश्यक पोषक तत्वे शरीराला मिळू शकतात.

फाल्कन गॉगल

अंतराळवीरांना तीन वेगवेगळ्या प्रकारच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रांसाठी तयार असणे आवश्यक आहे: पृथ्वीवरून निघताना वजनहीनता, दुसर्‍या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण आणि परतीच्या प्रवासात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण या बदलांमुळे शरीरावर बराच ताण येतो. संतुलन बिघडून डोकं- डोळा, हात व डोळा असे समन्वय असंतुलित होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, मळमळ असे त्रास अंतराळवीरांना जाणवू शकतात, हे टाळण्यासाठी फाल्कन गॉगलचा पर्याय वापरला जातो.

सौर उर्जा स्त्रोत

नासा सोलर अॅरे तंत्रज्ञानाच्या तीन पॅकेजपैकी दुसरे पॅकेज यावेळेस आयएसएससाठी पाठवत आहे. सौर पॅनेल यानाच्या बाजूंनी चटईसारखे बाहेर पडतात. व याचा वापर करून, उर्जा-उत्पादन क्षमता वाढवता येते. हे सौर पॅनल स्पेस स्टेशन संशोधन आणि ऑपरेशन्ससाठी उर्जेमध्ये २०-३०% वाढ प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा << Black Hole Sound: अंतराळातून येत आहेत रडण्याचे विचित्र आवाज; NASA ने सांगितले, असं होतंय कारण..

वैद्यकीय किट

वैद्यकीय निदानासाठी मून मायक्रोस्कोप किट सुद्धा पाठवण्यात येणार आहे. या किटमध्ये एक पोर्टेबल सूक्ष्मदर्शक आणि रक्ताचे नमुने घेण्याचे मशीन समाविष्ट असणार आहे. अंतराळवीर रक्ताचा नमुना गोळा करून सूक्ष्मदर्शकाने तपासणी करू शकतात तसेच ही माहिती पृथ्वीवर पाठवू शकतात, यानुसार आवश्यक ते उपचार त्यांना सुचवले जातील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What does astronaut eat in space nasa sends mission to international space station via elon musk spacex svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×