प्रश्न – माझ्याकडे एक टेराबाइटची हार्डडिस्क आहे. ही हार्डडिस्क सध्या कोणत्याही संगणकावर रीड होत नाही. यावर काय उपाय आहे.                        – दयानंद खिलारे
उत्तर – हार्डडिस्क संगणकाला जोडा. त्यानंतर स्टार्टमध्ये जाऊन रनमध्ये जा. यानंतर diskmgmt.msc असे टाइप करा. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. नंतर डब्लूडी पासपोर्ट ड्राइव्हवर राइट क्लिक करून “Change Drive Letter and Paths…” निवडा. यानंतर अ‍ॅड बटनमध्ये जाऊन ड्राइव्ह सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. तुमची हार्डडिस्क संगणकात याआधी अ‍ॅड केलेली असेल तर अ‍ॅडऐवजी तुम्हाला चेंजचा पर्याय येईल. तेथे क्लिक करा. ही प्रक्रिया करून तुमची हार्डडिस्क रीड होईल. तरीही न झाल्यास तुम्हाला हार्डडिस्क बदलावी लागेल.     

– तंत्रस्वामी