लोकसत्ता , प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २९ हजार ९१४ झाली असून शहरात करोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे.आतापर्यंत शहरात  एकूण २५,७७६ करोनाबधित करोनामुक्त झाले आहेत

आज शहरात ३५९ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ३० हजारांजवळ येऊन ठेपली आहे. शहरात आज  तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ६५० झाली आहे.  तर शहरात   ३,४८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण १,५५,६५३  चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर  वाढला आहे. तर मृत्यूदर कमी झाला आहे.